NEWS

ZEE MAHARASHTRA KUSTI DANGAL – 1ST NOV MATCHES UPDATES

झी महाराष्ट्र कुस्ती दंगल : ४ नोव्हेंबर : दिवस ०३ : 
पहिला सामना

विदर्भाचे वाघ संघाचा पहिल्या सामन्यात ५-१ने दणदणीत विजय
– झी महाराष्ट्र कुस्ती दंगल 
– १८ नोव्हेंबरपर्यंत रंगणार कुस्तीचा महामुकाबला
उत्कंठावर्धक डावांसह झी महाराष्ट्र कुस्ती दंगलच्या तिसऱ्या दिवतील पहिला सामना पार पडला. कुस्तीचा हा महासंग्राम श्री शिव छत्रपती क्रीडापीठ म्हणजेच पुण्याच्या महाळुन्गे-बालेवाडी स्टेडियममध्ये पुढील पंधरा दिवस रंगणार असून फक्त आणि फक्त झी टॉकीज वाहिनी व झी५ ऍपवर लाइव्ह बघता येईल. दंगलच्या पहिल्या पर्वाची २ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. तिसऱ्या दिवशी ५-१ने लढती जिंकत अभिनेता स्वप्नील जोशीच्या विदर्भाचे वाघ संघाने रविवारच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच सोनबा गोंगाणे पहिल्या सामन्यातील आजचा कुस्तीवीर म्हणजेच प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. 

ग्लॅमर इंडस्ट्रीमधील उमेश कामत, प्रिया बापट, सुयश टिळक, श्रुती अत्रे, दीप्ती देवी, पूजा पवार, नानुभाई जयसिंघानी आदी सेलिब्रिटींच्या उपस्थितीत तिसरा दिवस पार पडला. वीर मराठवाडा(संघमालक नागराज मंजुळे), कोल्हापुरी मावळे(सई ताम्हणकर), विदर्भाचे वाघ(संघमालक स्वप्नील जोशी), यशवंत सातारा(संघमालक पुरुषोत्तम जाधव), पुणेरी उस्ताद (संघमालक शांताराम मनवे व परितोष पेंटर) आणि मुंबई अस्त्र(संघमालक प्रणव डाके) असे एकूण सहा संघ झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये खेळत आहेत. प्रत्येक संघ हा कुस्तीचा महासंग्राम रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या नियमांनुसार फ्रीस्टाइल पद्धतीने खेळणार आहे. कुस्तीच्या या महापर्वाअंतर्गत १८ नोव्हेंबरपर्यंत रोज चार संघांमधील दोन सामने असे एकूण बारा डाव रंगणार आहेत. झी महाराष्ट्र कुस्ती दंगलच्या फॉरमॅटमध्ये राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला व पुरुष कुस्ती चॅम्पियन्स एकमेकांसोबत भिडताना दिसत आहेत. पुढील पंधरा दिवसांतील सर्व सामने श्री शिव छत्रपती क्रीडापीठ म्हणजेच पुण्याच्या महाळुन्गे-बालेवाडी स्टेडियममध्ये रंगणार आहेत. 

कोल्हापुरी मावळे विरुद्ध विदर्भाचे वाघ :

डाव १ – ८६ वजनगटातील प्रसाद सस्ते विरुद्ध आर्मेनिया देशातील मार्गरेन वॉल्टर यांच्यातील लढत अतिशय प्रेक्षणीय ठरली. प्रसादने आक्रमक खेळी दाखवली असली आंतरराष्ट्रीय खेळाडू वॉल्टरचा अनुभव कामी आला. अखेर विदर्भाचे वाघच्या वॉल्टरने ७-९ने प्रसादला हरवले.
डाव २ – ६५ वजनगटातील प्रदीप कुमार आणि सोनबा गोंगाणे या दोघांमध्ये कडवी झुंज बघायला मिळाली.
भारंदाज डावासाठी प्रसिद्ध असलेल्या प्रदीपने पहिल्या मिनिटात ८ गुण मिळवले. तर मोळी डावाचा वापर करत सोनबाने जिदारी दाखवत कम बॅक केले. अवघ्या २१ वर्षांच्या सोनबाने अखेर १२ गुण मिळवत प्रदीपच्या छातीवर बसून त्याला चितपट केले.
डाव ३- ७४ वजनगटातील अण्णा जगताप आणि कुमार शेलार यांच्यात अत्यंत अटीतटीचा डाव रंगला.  या एका सामन्यात चॅलेंज घेऊन गुणांमध्ये दोन वेळा बदल करण्यात आले. शेवटच्या काही सेकंदापर्यंत रंगलेला हा डाव अखेर कुमारने तब्बल २३ गुणांसह जिंकला. कुमार आतापर्यंत झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये सर्वात जास्त गुण मिळवणारा खेळाडू ठरला.
डाव ४ – ५५ वजनगटातील मनाली जाधव विरुद्ध दिशा कारंडे यांच्यात जबरदस्त डाव रंगला. ८-११ गुणांसह विदर्भाचे वाघच्या दिशाने मनालीवर विजय मिळवला.
डाव ५- ८६+ वजनगटातील सचिन येलभर आणि विष्णू खोसे यांच्यात तुफानी लढत बघायला मिळाली. दोघांना एकमेकांचे प्लस आणि मायन्स पॉईंट्स माहीत असल्याने या खेळाडूंना एकमेकांविरुद्ध गुण मिळवणे सुरुवातीला अवघड गेले. अखेर चायना वॉल अशी ओळख असलेल्या सचिनने विदर्भाचे वाघचा कॅप्टन असलेल्या विष्णूवर ३-२ने विजय मिळवला.
डाव ६- ५७ वजनगटातील जोतिबा अटकळे आणि विजय पाटील यांच्यात चुरशीची कुस्ती झाली. उत्तम डिफेन्सिव्ह खेळी यानिमित्त बघायला मिळाली. १-४ने विजय विजयी ठरला.

० तिकीटविक्री सुरू
कुस्तीचा हा नवा वैभवकाळ स्वतःच्या याची देही याची डोळा अनुभवायचा असल्यास paytm आणि insider.in वरून सर्व सामन्यांची तिकिटे ऑनलाइन बूक करता येतील. तसेच श्री शिव छत्रपती क्रीडापीठ म्हणजेच पुण्याच्या महाळुन्गे-बालेवाडी स्टेडियमवरही तिकिटांची काऊंटर्स आहेत.

आजच्या तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या सामन्यात पुणेरी उस्ताद मैदानात उतरणार आहेत ते वीर मराठवाडा विरूध्द!